पुणे विभागात एक लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांची नोंदणी   

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पुणे विभागातून चार दिवसांत १ लाख ४१ हजार ६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ५ जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना पसंतीनुसार कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येतील.
 
प्रवेश अर्जातील प्राधान्यक्रमानुसार गुणवत्तेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. व्यवस्थापन, संस्था अंतर्गत व अल्पसंख्यांक कोट्यातून मिळालेले प्रवेश रद्द करण्याची कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी लागणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी संमती नोंदवणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना मदत मिळावी, यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे. यातील अडचणी सोडविण्यासाठी विभागीय जिल्हा व तालुकास्तरावर मार्गदर्शन केंद्रे स्थापन केल्याची माहिती पुणे विभागीय प्रवेश नियंत्रण समिती अध्यक्ष सुनंदा वाखारे, सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.

Related Articles